सुरक्षाविषयक आधुनिक उपकरणांचे प्रदर्शन

सुरक्षाविषयक आधुनिक उपकरणांचे प्रदर्शन

सुरक्षाविषयक आधुनिक उपकरणांचे प्रदर्शन
मुंबई, ता. २२ ः अग्नीसुरक्षा व अन्य सर्व प्रकारच्या सुरक्षिततेसाठी लागणाऱ्या आधुनिक उपकरणांची माहिती देणारे प्रदर्शन येथे झाले. या प्रदर्शनात देशापुढील विविध सुरक्षाविषयक आव्हानांवरही चर्चा झाली. इन्फॉर्मा मार्केटतर्फे हे प्रदर्शन गोरेगावच्या नेस्को संकुलात आयोजित करण्यात आले होते. सुरक्षाविषयक उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या देश-विदेशातील ७५ कंपन्या यात सहभागी झाल्या तसेच त्यात किमान पाचहजार लोकांनी हजेरी लावली.
आधुनिक युगातील सुरक्षाविषयक परिस्थिती आणि सुरक्षा विषयातील आव्हाने यावरही परिषदेत चर्चा झाली. भारतीय सुरक्षा बाजारपेठेची व्याप्ती, त्यातील बदल, नवे कल, नवे शोध, आव्हाने आणि संधी तसेच भविष्यातील विकास आणि वाढ यांचीही माहिती येथे मिळाली.
या प्रदर्शनात राज्याच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या माजी संचालक डॉ. रुक्मिणी कृष्णमूर्ती तसेच संजीव तिवारी, राजेश शर्मा, इनफॉर्मा मार्केटचे एम.डी. योगेश मुद्रास आणि इन्फॉर्म मार्केटचे समूह संचालक पंकज जैन यांनी आपले विचार मांडले. या वेळी इंडिया रिस्क रिव्ह्यू २०२३ या श्वेतपत्रिकेचे प्रकाशनही करण्यात आले. मिटकॅट ॲडव्हायझरी तर्फे ही श्वेतपत्रिका तयार करण्यात आली होती. देशापुढील धोक्याचे वातावरण कसे आहे व त्यातील आव्हाने काय आहेत हे समजून घेण्यासाठी हा अहवाल उपयोगी ठरेल असेही या वेळी सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com