ठाकरे गटाकडून सभांचा सपाटा

ठाकरे गटाकडून सभांचा सपाटा

तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे, तसेच शिंदेंच्या शिवसेनेवर ओढलेले ताशेरे घराघरांत पोहोचवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई शाखेच्या वतीने सभांचा सपाटा लावण्यात आला आहे. या सभांमधून नवी मुंबईतील मतदारांना ठाकरे गटाकडून साद घालण्यात येत असून या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील सात नोडमध्ये ठाकरे गटाकडून सभा घेण्यात येत आहेत. ठाकरे गटात जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या सभांमध्ये न्यायालयाने शिंदे यांच्या शिवसेनेवर नोंदवलेल्या निरीक्षणावर संवाद साधला जात आहे. तसेच याबाबतची पत्रकेही घरोघरी जाऊन वाटप केली जात आहेत. यावेळी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत आलेले हे सरकार बेकायदा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने उघड झाले आहे. तसेच दडपशाही करण्यासाठी सत्ताधारी सुडाचे राजकारण करीत असल्याचा दावा जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांनी केला आहे.
------------------------------------------
भाजपच्या राजकारणामुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकशाही भक्कम करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने एक विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे.
- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख, ठाकरे गट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com