Tue, October 3, 2023

मारहाणप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
मारहाणप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
Published on : 22 May 2023, 11:44 am
चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विक्रांत दवणे, स्वप्नील वाघमारे, आसिफ मन्यार, रवींद्र शिवशरण, अविनाश अशी आरोपींची नावे आहेत.
चेंबूर येथील पीडित उमेश मुलाणी याला काही दिवसांपूर्वी रात्री मोबी हब या दुकानाबाहेर भेटण्याकरिता बोलावले होते. येथे मुलाणी येताच त्याला त्याने सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीबद्दल शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तातडीने चेंबूर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर चेंबूर पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकारणाचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत.