
वज्रेश्वरी संस्थानच्या अध्यक्षपदी विधिज्ञ मधुकर पाटकर
वज्रेश्वरी, ता. २२ (बातमीदार) : प्रसिद्ध श्री. वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वकील मधुकर पाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मार्च महिन्यात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या मासिक सभेत हजर असलेल्या विश्वस्तांमधून मधुकर पाटकर यांची निवड झाली. वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानचे खालील विश्वस्त सध्या संस्थानचा कारभार पाहतात. यात अध्यक्षपदी मधुकर पाटकर, विश्वस्त मिलिंद यशवंत चोरघे, परंपरागत विश्वस्त धनेश हेमेंद्र गिरी गोसावी, राजू शांताराम पाटील, विवेक रामचंद्र पाटील या पाचही विश्वस्तांनी आपसात चर्चा करून बहुमताने पाटकर यांची अध्यक्षपदी निवड केली. पाटकर यांची अध्यक्षपदी निवड होताच इतर सहकारी विश्वस्त कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर स्थानिक ग्रामस्थ व भाविकांकरीता देवस्थान तर्फे विविध विकासात्मक कामे करून विविध सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मनोदय पाटकर यांनी यावेळी व्यक्त केला.