तात्पुरत्या स्‍वच्छतागृहासाठी ११ लाखांचा खर्च? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तात्पुरत्या स्‍वच्छतागृहासाठी ११ लाखांचा खर्च?
तात्पुरत्या स्‍वच्छतागृहासाठी ११ लाखांचा खर्च?

तात्पुरत्या स्‍वच्छतागृहासाठी ११ लाखांचा खर्च?

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः पश्चिम भागातील पारशीवाडी येथे गणेश मैदान शेजारी नवीन स्‍वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. दरम्‍यान स्थानिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेने तात्पुरते स्‍वच्छतागृह बांधले आहे. येथे दहा शौचकूपे असून यासाठी पालिकेने अधिक निधी खर्च केल्याचा मनसेकडून आरोप करण्यात येत आहे. या कामासाठी पालिकेने ११,३७,२६४ रुपये खर्च केला असल्याचे सांगत यात पालिकेचे काही अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप मनसेचे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी केला आहे.
पारशीवाडी गणेश नगर येथे जीर्ण झालेले स्‍वच्छागृह तोडून नवीन दुमजली स्‍वच्छतागृहाचे बांधकाम सुरू आहे. या दरम्‍यान नागरिकांच्या सुविधेसाठी पालिकेने तात्पुरते स्‍वच्छागृह बांधून दिले आहे. यासाठी ११,३७,२६४ रुपये निधी खर्च करण्यात आले असल्याचे मनसे शाखाध्यक्ष अरविंद गीते यांनी सांगितले. तात्पुरत्या बांधकामासाठी ऐवढा खर्च कसा? असा सवाल त्यांनी केला असून यात काही अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांचे संगनमत आहे, असा आरोप गीते यांनी केला आहे. याबाबत एन वार्ड पालिकेचे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

स्‍वच्छतागृहाच्या खर्चाबाबत काहीच कल्पना नाही. तात्पुरत्या बांधकामासाठी ऐवढा खर्च योग्य नाही. याबाबत पालिकेकडून मी माहिती मागवली आहे.
- सूर्यकांत गवळी, माजी नगरसेवक

पारशीवाडी येथे नवीन स्‍वच्छतागृहाचे काम सुरू आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी तात्पुरते २४ शैचकूपांचे स्‍वच्छतागृह ठरले होते; मात्र जागे अभावी दहाचे बांधले आहे. त्याचे पेमेंट अद्याप केलेले नाही. तरीही अधिक माहिती आम्ही घेत आहोत.
- सचिन बेलदार, सहायक अभियंता, एन वॉर्ड