डोंबिवली जिमखान्याचा खासगीकरणाचा घाट

डोंबिवली जिमखान्याचा खासगीकरणाचा घाट

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ : डोंबिवली जिमखान्याची कार्यकारिणी मनमानी कारभार करत खासगीकरणाचा घाट घालत असल्याचा आरोप करत जिमखाना सदस्यांनी कार्यकारिणी विरोधात रविवारी लाक्षणिक उपोषण पुकारले. सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता खेळाचा सराव, व्यायाम शाळा याचे दर वाढविण्यात आले आहेत असा आरोप देखील सदस्यांनी केला. तर जिमखान्याची प्रतिमा डागाळण्यासाठी हे केले जात असल्याची प्रतिक्रिया जिमखाना व्यवस्थापनाने मांडली आहे.
डोंबिवली जिमखान्याचे सदस्य आणि भाजपचे माजी नगरसेवक राहुल दामले यांच्या नेतृत्वाखाली जिमखान्यातील अनेक सदस्य या उपोषणात सहभागी झाले होते. जिमखाना सदस्यांना विश्वासात न घेता खासगीकरणाचा घाट घालण्यात आला आहे. जिमखान्यात प्रशिक्षण संस्था, खासगी प्रशिक्षक, संस्थांचे प्रशिक्षक नेमले जात आहेत. जिमखान्यातील व्यवहारांची कागदोपत्री माहिती मागवूनही ती दिली जात नाही. सदस्यांनी याला आक्षेप घेतला आहे. सामोपचाराने चर्चा करण्यास सदस्य तयार आहेत, मात्र त्यास वेगळे वळण दिले जात असल्याचे यावेळी दामले यांनी सांगितले. जलतरण तलावात बाहेरील विद्यार्थ्यांना नऊ वाजता प्रवेश द्यावा. लॉन टेनिस कोर्टाच्या ठिकाणी उत्सव काळात मंच दिले जातात. सभासद शुल्क सोळाशे रुपयांवरून सात हजार रुपये करण्यात आले आहे. त्या प्रमाणात सदस्यांना कोणत्या सेवा सुविधा दिल्या जातात अशा सदस्यांच्या काही मागण्या आहेत, त्याचा विचार केला जात नाही. शुल्क वाढवून कोणता हेतू साध्य केला जात आहे, असे प्रश्न दामले यांनी केले.
....
लवकरच एकत्रित बैठक
सदस्य उपोषणाला बसल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत कार्यकारिणी सोबत सदस्यांची चर्चा घडवून आणली. या चर्चेत लवकरच सदस्यांची एकत्रित बैठक एसजीएम बोलावून घेण्यात येईल, असे आश्वासन मधुकर चक्रदेव यांनी दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले.
....
समन्वयाचा अभाव असल्याने गैरसमजुतीतून हा सर्व प्रकार घडला आहे. लवकरच कार्यकारिणी सदस्य, सभासदांची मिटींग घेत त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.
- दिलीप भोईर, अध्यक्ष, डोंबिवली जिमखाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com