बचत गटाच्या महिलांची सुरतवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचत गटाच्या महिलांची सुरतवारी
बचत गटाच्या महिलांची सुरतवारी

बचत गटाच्या महिलांची सुरतवारी

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता.२३ (वार्ताहर)ः स्वच्छता यात्रा मोहिमेअंतर्गत सुरत महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन संदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यासाठी पनवेलमधील १५ महिला बचत गटांचा अभ्यास दौरा घडवून आणला होता. या माध्यमातून घनकचऱ्यातून रोजगार निर्मितीसह उत्पन्न वाढीसाठीच्या दिशेने पालिकेने नवे पाऊल टाकले आहे.
सुरत महापालिकेच्यावतीने इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर तसेच रात्रीच्या वेळी यांत्रिकी पद्धतीने तसेच मनुष्य बळाच्या साहाय्याने करण्यात येणारी रस्त्यांची साफसफाई, कचरा पुर्नप्रक्रिया सुविधा केंद्र, प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प, कचरा व्यवस्थापन प्रकल्प करण्यात आला आहे. पनवेल महापालिकेने या उपक्रमांची माहिती पनवेलमधील महिला बचत गटाच्या महिलांना व्हावी, यासाठी अभ्यास दौरा ८ ते १५ मे दरम्यान केला होता. या अभ्यास दौऱ्यामध्ये पनवेलमधील १५ बचत गटाच्या महिलांना सहभाग घेतला होता.
--------------------------------------
रोजगार निर्मितीवर भर
कचरा पूर्नप्रक्रिया सुविधा केंद्रांमध्ये जैविक पदार्थापासून तयार होणारे गांडुळ खत, अजैविक पदार्थांपासून तयार केलेले पेव्हर ब्लॅाक यांची सखोल माहिती देण्यात आली. तसेच पनवेल महापालिकेतही घनकचऱ्यातून रोजगार निर्मितीसह उत्पन्न वाढीसाठी सुरत महापालिकेच्या धरतीवर प्रयत्न होणार आहेत.
-------------------------------------------
सुरत महापालिकेत राबवण्यात येत असलेल्या घनकचऱ्यातून रोजगार तसेच उत्पन्न वाढ प्रकल्पाप्रमाणे पनवेल पालिकाही घनकचऱ्याचा प्रकल्प राबवणार आहे. त्या अनुषंगाने हा अभ्यास दौरा काढला होता.
-सचिन पवार, उप-आयुक्त, पनवेल महापालिका