
विक्रमगड तालुक्यात शासन आपल्या दारी अभियान
विक्रमगड (बातमीदार) : प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यात यावा, या हेतूने शासकीय योजना सुलभीकरण अभियान राबवण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी शासन आपल्या दारी हे अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून विक्रमगड तालुक्यात २२ मे २०२३ ते २ जून २०२३ या कालावधीत विविध गावांत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विक्रमगड तालुक्यात २३ मे रोजी तलवाडा, २४ मे रोजी आलोंडे, देहर्जे (२५ मे), विक्रमगड हायस्कूल (२६ मे), दादडे (२९ मे), साखरे (३० मे), कुरंझे (३१ मे), मलवाडा (१ जून), वेहेलपाडा (२ जून) या दिवशी शिबिर होणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रमगड तहसीलदार चारुशीला पवार यांनी केले आहे.