ट्रेलर चालकांची अरेरावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रेलर चालकांची अरेरावी
ट्रेलर चालकांची अरेरावी

ट्रेलर चालकांची अरेरावी

sakal_logo
By

उरण, ता. २२ ः बेशिस्त वाहनचालकांसह रस्त्यालगत होत असलेल्या ट्रेलरच्या पार्किंगमुळे दिघोडे चौकातून चिर्ले तसेच गव्हाण फाटा मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीने उच्चांक गाठला आहे. या मार्गावर तासनतास वाहनांच्या रांगा लागत असल्याने सर्वसामान्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
गव्हाण फाटा-दिघोडे मार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी, या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम खात्याने काही वर्षांपूर्वी गव्हाण फाटा, दिघोडे मार्गाचे रुंदीकरण केले होते. त्यामुळे रस्ते मोठे झाल्याने जेएनपीटी परिसरातील बंद पडलेले सीएफएस आणि रिकामे कंटेनरच्या गोदाम मालकांनी या परिसरात मोर्चा वळवून अधिकृतबरोबरच बेकायदा गोदामे उभी केली आहेत. त्यामुळे या भागात आता कंटेनरची वाहतूक करणाऱ्या ट्रेलरची वर्दळ वाढलेली आहे. या ट्रेलर चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे कोणतेही पालन केले जात नाही. त्यामुळे गोडाऊन मालकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूची एक लेन पार्किंगसाठी वापरल्याने प्रवासी वाहनांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे.
------------------------------------------------
प्रवासी, विद्यार्थ्यांची गैरसोय
रस्त्याच्या दोन्ही मार्गिकेवर वाहने उभी असल्याने एखादे वाहन बंद पडले तर या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. अशातच काही ट्रेलर चालक यार्डामध्ये वाहन नेण्यासाठी बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने या कोंडीमध्ये प्रवासी, विद्यार्थी तासनतास अडकून राहत असल्याने दिघोडे चौकातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
़़़़़़़़़ः---------------------------------------------
दिघोडे चौकात सततची वाहतूक कोंडी होते. या मार्गावर पार्किंगची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतूक विभागाने ठोस उपाययोजना करून वाहतूक सुरळीत होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- विवेक केणी, अध्यक्ष, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था