Thur, Sept 21, 2023

मोबाईल चोरणारे गजाआड
मोबाईल चोरणारे गजाआड
Published on : 22 May 2023, 3:52 am
भिवंडी, ता. २२ (बातमीदार) : डोंबिवली-उल्हासनगरमध्ये राहून भिवंडीसह इतर ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी गजाआड केले आहे. योगेश चंद्रलाल माखिजा (वय ३५, उल्हासनगर), करण रश्मीन गडा (वय २१, डोंबिवली) अशी आरोपींची नावे आहेत. शांतीनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून भिवंडीतील शांतीनगर पोलिस ठाणे आणि मानपाडा ठाणे असे दोन ठिकाणचे गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून पोलिसांनी दीड लाखांचे आठ मोबाईल फोन जप्त केले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.