‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे २६ तारखेला उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे २६ तारखेला उद्‍घाटन
‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे २६ तारखेला उद्‍घाटन

‘समृद्धी’च्या दुसऱ्या टप्प्याचे २६ तारखेला उद्‍घाटन

sakal_logo
By

सकाळ न्यूज नेटवर्क
मुंबई, ता. २२ ः हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ मे रोजी होणार आहे. सुमारे ८० किलोमीटर लांबीचा हा मार्ग भौगोलिक परिस्थितीमुळे आव्हान समजले जात होता. या महामार्गाचा तिसरा टप्पा शिर्डी ते भिवंडी असा असेल. तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण काही तांत्रिक प्रश्न निर्माण झाल्यामुळे लांबवण्यात आले आहे. २६ मे रोजी दुपारी ४ वाजता उद्‍घाटनाचा कार्यक्रम होणार आहे, असे समजते. या महामार्गावरील इगतपुरी ते ठाणे हा प्रवास अत्यंत नयनरम्य आहे. हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शिर्डी-भिवंडी परिसरात एक निर्माणाधीन खांब पडल्याने सर्व प्रकारची काळजी घेऊनच हा महामार्ग खुला केला जाईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील सूत्रांकडून समजते. सर्व टप्पे २०२३ च्या अखेरीस किंवा २०२४ च्या प्रारंभी खुले होतील, असे मानले जात आहे.