मुंबई म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरुवात
मुंबई म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरुवात

मुंबई म्हाडाच्या अर्ज नोंदणीला सुरुवात

sakal_logo
By

मुंबई, ता. २२ : म्हाडा मुंबई मंडळाने विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या चार हजार ८३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा आरंभ मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते सोमवारी (ता.२२) रोजी ''गो-लाईव्ह'' कार्यक्रमांतर्गत करण्यात आला.
या घरांसाठी संगणकीय सोडत १८ जुलैला पार पडणार आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील मंडळाचे मुख्य अधिकारी यांच्या कार्यालयाच्या समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला म्हाडाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या वेळी मिलिंद बोरीकर यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले.नोंदणी प्रक्रिया सुरू होताच सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६५५ अर्ज दाखल झाले होते तर २०८ नागरिकांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले.