अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला ग्रामस्थ

अपघातग्रस्त तरुणाच्या मदतीला ग्रामस्थ

नवी मुंबई, ता.२३ (वार्ताहर): एका अपघातात गंभीर जखमी असलेला सानपाडा गावातील प्रेम पाटील दीड महिन्यापासून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या तरुणाच्या उपचाराचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे प्रेम पाटीलचे कुटुंब हतबल झाले होते. मात्र, अशा परिस्थितीत सानपाडा ग्रामस्थ पाटील कुटुंबियांच्या मदतीला धावून आले असून मोठी आर्थिक मदत उभी केली आहे.
सानपाडा गावात राहणारा प्रेम पाटील (२५) व दीपेश पाटील (२१) या दोघांची १२ एप्रिल रोजी सायंकाळी वाशी खाडी पुलावर टेम्पोच्या धडकेत अपघात झाला होता. या अपघातात दीपेशचा मृत्यू झाला होता. तर प्रेम पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पण रिक्षाचालक असलेल्या प्रेम पाटीलच्या वडिलांनी ऐपतीप्रमाणे मुलाला वाचवण्यासाठी खर्च केला. मात्र, पुढील उपचारासाठी पैसे नसल्याने हतबल झाले होते. अशा परिस्थितीत सानपाडा ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले असून सानपाडातील शिवसेनेचे माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांनी सोशल मिडियातून ग्रामस्थांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
----------------------------------
सर्वांचा खारीचा वाटा
गावातील दानशूर व्यक्तींसह, सामाजिक संस्था, क्रिकेट मंडळ, महिला मंडळ, सांस्कृतिक मंडळाचा मोठा सहभाग आहे. प्रेम पाटील याच्यासाठी आणखी अनेक दानशुर व्यक्ती मदतीसाठी पुढे येत आहेत. सानपाडा ग्रामस्थांनी प्रेमच्या उपचारासाठी मदतीचा हात देऊन एक प्रकारे इतरांना आदर्श घालून दिला आहे.
------------------------------------
प्रेम पाटील याच्या कुटुंबीयांनी ऐपतीप्रमाणे रुग्णालयाचा खर्च भागावला. मात्र, उपचाराचा खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे समजल्यानंतर सानपाडा ग्रामस्थांना आवाहन केले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद देत मोठी आर्थिक मदत उभी केली आहे.
- सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक, सानपाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com