Wed, Sept 27, 2023

बांधकाम व्यावसायिकाला दीड लाखांचा दंड
बांधकाम व्यावसायिकाला दीड लाखांचा दंड
Published on : 23 May 2023, 12:25 pm
घणसोली, ता.२३ (बातमीदार)ः नवी मुंबई मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. या अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
घणसोली विभागात रोज नवनवीन कारवाया होत असून महापालिकेच्या वतीने सोमवारी दुपारी कोपरखैरणे रेल्वे स्टेशनहुन घणसोली विभागात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर अडवणूक करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये एकूण तीन विकासकांनी कोणतीही परवानगी न घेता रास्ता हडपल्याने महापालिकेने कारवाई करत प्रत्येकी ५० हजार असा दीड लाखांचा दंड ठोठावला आहे.