तलावास प्रदूषित करणारी गटारे बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावास प्रदूषित करणारी गटारे बंद करा
तलावास प्रदूषित करणारी गटारे बंद करा

तलावास प्रदूषित करणारी गटारे बंद करा

sakal_logo
By

भिवंडी, ता. २३ (बातमीदार) : वऱ्हाळा तलावात गटाराचे सांडपाणी गेल्याने तलावातील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे हा तलाव प्रदूषित करणारी गटरे बंद करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वऱ्हाळा तलावातील दोन एमएलडी पाणी शुद्धीकरण करून शहरातील नागरिकांना पुरविले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या तलावालगत असलेल्या गटारातील सांडपाणी तलावात जाऊन तलावाचे पाणी प्रदूषित होत आहे. यामुळे तलावांमधील जीवजंतूंना धोका निर्माण झाला असून तलावातील मच्छी व्यवसाय अडचणीत आला आहे. तसेच तलावाच्या शेजारी महापालिकेचे तीन गार्डन असून त्यापैकी एका गार्डनची जोपासना उत्तम होत आहे. तसेच एक खेळाचे मैदान आहे. मात्र या तलावालगत सार्वजनिक शौचालय सुरू असल्याने परिसरातील नागरिक शौचालयाचे पाणी आणि रहिवासी वस्तीतील गटाराचे पाणी तलावात जात असल्याचा आरोप करीत आहे. या तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते हे माहित असताना देखील लोकवस्तीलगत गटाराचे बांधकाम करण्याऐवजी तलावा लगत गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे; पण आता गटाराला गळती लागून त्यामधील सांडपाणी तलावात जाऊन ते पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे तलावाभोवतालची गटारे पालिकेच्या बांधकाम विभागाने तात्काळ बंद करून ती गटारे आणि सार्वजनिक शौचालये लोकवस्ती लगत बांधावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
-------------------------------------
परिसराचा सर्व्हे करून तलावात सांडपाणी जाऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येईल. तसेच गटाराला लागलेल्या गळतीची दुरुस्ती करून सांडपाणी योग्यरीत्या प्रवाहित करून तलावात सांडपाणी जाणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.
- सुनील घुगे, शहर अभियंता, भिवंडी महापालिका