Wed, Sept 27, 2023

यज्ञेश्वर बागराव यांची निवड
यज्ञेश्वर बागराव यांची निवड
Published on : 23 May 2023, 11:39 am
अंबरनाथ, ता. २३ (बातमीदार) : ठाणे जिल्हा ट्रायथलॉन असोसिएशनचे अध्यक्ष यज्ञेश्वर बागराव यांची भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनमध्ये कार्यकारी समिती सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. चेन्नई येथे १८ मे रोजी झालेल्या भारतीय ट्रायथलॉन फेडरेशनच्या निवडणूकीत यज्ञेश्वर बागराव यांची पुढील पाच वर्षासाठी कार्यकारी समिती सदस्य या पदावर निवड झाली आहे. या निवडणुकीसाठी २५ राज्य संघटनेचे सदस्य उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त न्यायाधीश एस नंबीराजन यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.