दोन हजारांच्या नोटांमुळे कल्ला

दोन हजारांच्या नोटांमुळे कल्ला

तुर्भे, ता.२३ (बातमीदार): दोन हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपासून चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून नवी मुंबईतील विविध विभागातील बाजारपेठांमध्ये दोन हजारांच्या नोटा खपवण्यासाठी गर्दी होत आहे.
रिझर्व्ह बॅंक अॅाफ इंडियाने दोन हजारांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतल्यापासून अफवांना उधाण आले आहे. अशातच पसरवण्यात येणारे गैरसमज आणि अपुऱ्या माहितीमुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. याची प्रचिती शहरातील बाजारपेठांमध्ये पाहावयास मिळत आहे. बँकेने दोन हजारांच्या कितीही नोटा बँकेत जमा करू शकता. पण नोटा बदलताना वीस हजारांपर्यंतच्या नोटा एकावेळी बदलता येतील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोक काहीही करून असलेले २ हजारांची नोट खर्ची करण्याची चढाओढ अनेकांमध्ये लागलेली आहे.
-----------------------------------------------
वादावादीचे प्रसंग
शहरातील एपीएमसी मार्केट, मोठ मोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, पेट्रोल पंप, डीमार्ट, रिलायन्स फ्रेश, मॉल्स, ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये होणाऱ्या व्यवहारात दोन हजारांचे चलन वापरण्याचे प्रमाण वाढले असून व्यावसायिक, दुकानदारांची अडचण होत आहे. तर काही ठिकाणी दोन हजारांच्या नोटांवरून ग्राहक-दुकानदारांमध्येच वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. काही ठिकाणी दुकानदार नोट घेत नसल्याचा आरोप होत असल्याने कारवाईची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
----------------------------------------------
एपीएमसी मार्केटमध्ये दररोज कोट्यवधीची उलाढाल होत असते. दोन ते तीन वर्षांमध्ये दोन हजारांच्या नोट चलनात कमी प्रमाणात येत होती. मात्र, या आठवड्यात त्याचे प्रमाण खूप वाढले आहे.
-मनोहर तोतलानी, व्यापारी, कांदा बटाटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com