नोकरीच्या प्रलोभनाने तरुणांना गंडा

नोकरीच्या प्रलोभनाने तरुणांना गंडा

नवी मुंबई (वार्ताहर): शिपिंगमध्ये नोकरीस इच्छुक असलेल्या बेरोजगार तरुणांना परदेशात नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका टोळीने लाखो रुपये उकळून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या टोळीमध्ये अजहर एस. मुल्ला, अंकिता, आशिका व शिवम या चौघांचा समावेश आहे. या टोळीने एपीएमसीतील पामबीच लगत फ्युचरिक मेरिटाईम नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर या टोळीने मरिन अकॅडमीचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना संपर्क साधून त्यांच्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध असल्याचे सांगत ३ ते ४ लाख रुपये भरावे लागतील, असे सांगितले होते. या प्रकरणात देशभरातील तरुणांना कोट्यवधीचा गंडा घातल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com