
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : महावितरणच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सोमवार (ता.२३) पासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणाची हाक दिली होती. मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच दिव्यांग कल्याण विभागाचे सचिवंसोबत सकारत्मक चर्चा झाल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती महावितरणच्या आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी दिली.
प्रहार संघटनेच्या माध्यमातून महावितरणसह इतर सरकारी आणि निमसरकारी कार्यालयात काम करणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात राज्यव्यापी बेमुदत उपोषणाची हाक दिली. यामध्ये बीएमसी, कृषी/अकृषिक विद्यापीठे यांसह महावितरण, महापारेषणमधील कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले. २०० हून अधिक कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते. महावितरण आणि महापारेषणच्या कर्मचाऱ्यांची मागणी प्रामुख्याने प्रलंबित दिव्यांग वाहतूक भत्ता व सहायक तंत्रज्ञान प्रकरणे मार्गी लावणे ही ठेवण्यात आली होती.
...
आश्वासन मिळाले!
मंत्रालयातील बैठकीनंतर माहिती देताना महावितरण कर्मचारी अमित मिश्रा म्हणाले, सोमवारपासून आम्ही आझाद मैदानात आंदोलन करत आहोत. आज मंत्रालयात दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव महाजन यांनी संघटना प्रतिनिधीसह आम्हाला भेटीसाठी बोलावले. या भेटीत पुढील दोन महिन्यांत संघटनेच्या मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे संघटनेने उपोषणास तात्पुरती स्थगिती दिली आहे.