सेंट जॉर्ज रुग्णालयातील दोन विभाग बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेंट जॉर्ज रुग्णालयातील दोन विभाग बंद
सेंट जॉर्ज रुग्णालयातील दोन विभाग बंद

सेंट जॉर्ज रुग्णालयातील दोन विभाग बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : राज्य सरकारच्या जे. जे. रुग्णालय समूहातील सेंट जॉर्ज रुग्णालयात कर्मचाऱ्यांसह निवासी डॉक्टरांचा तुटवडा असल्याने येथील दोन विभाग कोविडनंतर बंद पडले आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ विभाग, बालरोगतज्ज्ञ विभाग बंद असल्याने इथल्या रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शस्त्रक्रिया विभागाची दुरुस्ती सुरू असल्याने मोजक्याच आणि सोप्या शस्त्रक्रिया होत आहेत.
कर्मचाऱ्यांसह विभागनिहाय डॉक्टरच उपलब्ध नसल्याने कित्येक विभागांमधील रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. काही रुग्ण चुकून सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारांसाठी आल्यास त्यांना जे. जे. रुग्णालयात जाण्यास सुचवण्यात येते. शस्त्रक्रियागृह येत्या दोन आठवड्यांत सुरू केला जाईल, असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या समूह साखळीतील सेंट जॉर्ज हे अत्यंत महत्त्वाचे रुग्णालय आहे. या ठिकाणी कुलाबा म्हणजे दक्षिण मुंबईतील रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच हे रुग्णालय रेल्वे अपघात झाल्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. कारण मध्य रेल्वेला जवळ असणारे हे रुग्णालये आहे. त्याच वेळी पूर्व द्रुतगती मार्गावरील सरकारी रुग्णालयांतील अपघातग्रस्तांना मदतीसाठी हे रुग्णालये आहे. मात्र कोविडच्या दोन वर्षानंतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात ७० टक्क्यांनी रुग्ण घटल्याचे सांगण्यात येत आहे. या ठिकाणी बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नाहीत. त्याच वेळी इतर आजारांचे विशेषज्ञांच्या जागा रिक्त असल्याने कित्येक वेळा रुग्णांना जे जे रुग्णालय गाठण्यास सुचवले जाते. त्याच वेळी या ठिकाणी खाटांची संख्या रुग्णांच्या प्रमाणात अत्यंत कमी म्हणजे ४६७ असल्याचे सांगण्यात येत आहे.
...
केवळ छोट्या, आपत्कालीन शस्त्रक्रिया सुरू
कोविड काळात मुख्य ऑपरेशन थिएटरला आग लागली. नूतनीकरण चालू असून अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे मॉड्युलर ऑपरेशन थिएटर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मॉड्युलर ओटीवर छोट्या आणि आपत्कालीन नसलेल्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मुख्य ओटी उपलब्ध नसल्याने ओटीला आवश्यक असलेले प्लास्टिक सर्जरीसारखे विभाग या ठिकाणाहून जेजे रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. महत्त्वाचे असे शस्त्रक्रिया विभागच नसल्याने गंभीर अशा आणीबाणीच्या वेळी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये धाव घ्यावी लागत असल्याची तक्रारी रुग्ण करत आहेत.
..
रुग्णालयातील शस्त्रक्रियागृह दोन आठवड्यांत सुरू होऊ शकेल. सध्या एक छोटे शस्त्रक्रियागृह आहे. तेथे छोट्या शस्त्रक्रिया केल्या जातात. मुख्य शस्त्रक्रियागृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून काही किरकोळ गोष्टी प्रलंबित आहेत.
- डॉ. विनायक सावर्डेकर, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय