आयएएस काश्मिरा संखे

आयएएस काश्मिरा संखे

कश्मिरा संखेच्या यशाचा
कुंभवली गावात जल्लोष
पालघरच्या सुपुत्रीचे कौतुक
मनोर, ता. २३ (बातमीदार) ः डॉ. कश्मिरा संखे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मिळवलेल्या यशाने पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. कश्मिरा मूळची पालघर तालुक्यातील कुंभवली ग्रामपंचायत हद्दीतील एकलारे गावातील आहे. तिच्या यशाचा आनंद गावात एकमेकांना पेढे वाटून साजरा करण्यात आला.
कश्मिराचे वडील डॉ. किशोर संखे एकलारे गावचे सुपुत्र. डॉ. संखे आणि त्यांचे कुटुंब सध्या ठाणे शहरात वास्तव्यास आहेत. वंजारी समाजातील कश्मिरा संखे पहिली आयएएस होणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कश्मिराच्या यशाने वंजारी समाजात आनंदाचे वातावरण असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
डॉ. कश्मिरा संख्ये हिच्या यशाची प्रेरणा वंजारी समाज आणि जिल्ह्यातील तरुण-तरुणी नक्कीच घेतील. तिच्या यशाचा आनंद ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला, अशा शब्दात कुंभवली एकलारेच्या सरपंच ॲड. तृप्ती संखे यांनी भावना व्यक्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com