ट्विटरद्वारे घातपाताची मुंबई पोलिसांना धमकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्विटरद्वारे घातपाताची मुंबई पोलिसांना धमकी
ट्विटरद्वारे घातपाताची मुंबई पोलिसांना धमकी

ट्विटरद्वारे घातपाताची मुंबई पोलिसांना धमकी

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : मुंबई पोलिसांच्या ट्‍विटर हॅण्डलला टॅग करत बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला नांदेड जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. धमकी देणाऱ्याने ‘मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे’ असे आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ तपास सुरू करत मिळालेल्या माहितीच्या आधारे एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली आहे.
धमकीची पोस्ट २२ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने पोस्ट पाहताच संबंधित पोलिस ठाण्याला त्याविषयी माहिती दिली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे.

रविवारीही अशाच प्रकारचा एक दूरध्वनी आला होता. संबंधित व्यक्तीने आपण राजस्थानहून बोलत असल्याचे सांगत ‘२६/११ चा दहशतवादी हल्ला’ असा उल्लेख करत दूरध्वनी कट केला होता. त्या कॉलरचाही शोध सुरू आहे. आता ट्‍विटवरून धमकी देण्यात आल्याने पोलिसांनी सावधगिरी बाळगली आहे.

आधीच्या प्रकरणाचाही तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री मुंबई पोलिस कंट्रोल रूममध्ये आलेल्या एका दूरध्वनीवर ‘२६/११’चा उल्लेख करण्यात आला होता. त्याआधीही एक फोन आला होता. त्या वेळी संबंधित व्यक्तीने कुर्ला पश्चिम भागात स्फोट होईल, असे धमकावले होते. त्यानंतर रविवारी फोन आला. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे.