पोलिस दलातील १४३ अधिकाऱ्यांना बढती

पोलिस दलातील १४३ अधिकाऱ्यांना बढती

मुंबई, ता. २३ : गृह विभागाने सोमवारी १४३ पोलिस निरीक्षकांना सहायक पोलिस आयुक्तपदी बढती दिली, तर मुदत पूर्ण झालेल्या व काहीशा रखडलेल्या १५१ सहायक आयुक्त तथा पोलिस उपअधीक्षकांच्याही बदल्या केल्या. त्यात नक्षलग्रस्त गडचिरोली आणि चंद्रपूर भागातील अधिकाऱ्यांना पश्चिम महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. मुंबईत ४४ नवे सहायक पोलिस आयुक्त बढती होऊन आले आहेत. मुंबई पोलिस दलातील १० सहायक आयुक्तांच्या बदल्या झाल्या आहेत. राजू कसबे, संजय भालेराव, राजेंद्र मोकाशी, गौरी प्रसाद हिरेमठ, आनंद बांगर, विजय बेलगे, प्रदीप खुडे अशा मुंबईतील ४४ पोलिस अधिकाऱ्यांना सहायक पोलिस आयुक्तपदावर बढती देण्यात आली आहे. नितीन जाधव, प्रिया ढाकणे, सुनील गावकर, चंद्रशेखर सावंत, हेमंत सावंत, सुनील बोंडे अशा १० सहायक पोलिस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com