आरटीओकडून जप्त वाहनांचा लिलाव

आरटीओकडून जप्त वाहनांचा लिलाव

वाशी, ता. २४ (बातमीदार) : मोटार वाहन कर न भरलेल्या वाहनांना मुंबई मोटार वाहन कर अधिनियमांअतर्गत आरटीओकडून जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांना थकीत कर भरणा करण्यास कळवण्यात आले आहे. तरीदेखील काही वाहन मालकांनी कर भरलेले नाहीत. अशा वाहनांचा ई-ऑक्शन पद्धतीने लिलाव करण्याचे जाहीर केले आहे. २२ मे रोजी या वाहनांचा लिलाव करण्यात येणार होता; पण काही तांत्रिक कारणास्तव या वाहनांचा लिलाव पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा लिलाव ५ जूनला सकाळी ११ वाजता नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे. ई-लिलाव करण्यात येणाºया वाहनांमध्ये बस, ट्रक, जे.सी.बी, टुरिस्ट टॅक्सी यांचा समावेश आहे. लिलाव करण्यात येणाºया वाहनांची यादी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचना फलकांवर जाहीर करण्यात आलेली आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत थकबाकीदारांना कर भरण्याची संधी आहे. ज्या इच्छुक व्यक्तींना लिलावामध्ये भाग घ्यायचा आहे, त्यांनी लिलावाआधी संबंधित अटी ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतील त्या पाहव्यात, असे नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com