कोपरखैरणेतील कोंडीला सिडकोचा हातभार

कोपरखैरणेतील कोंडीला सिडकोचा हातभार

घणसोली, ता. २४ (बातमीदार)ः कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोर दिवसेंदिवस कोंडी वाढत चालली आहे. स्टेशनलगत असलेल्या भूखंडाची सिडकोने निविदा पद्धतीने विक्री केल्याने बहुमजली इमारत उभारणी सुरू आहे. सद्यस्थितीत चार इमारती तयार अवस्थेत असून उर्वरित इमारतींचे काम सुरू असल्याने भविष्यात स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोर बोनकोडे गाव व कोपरखैरणे रेल्वेस्टेशन दरम्यान पदपथ तसेच गटारासहित १५ मीटर रुंदीचा रस्ता आहे. मात्र, पालिकेच्या प्रस्तावित विकास आराखड्यात हा रस्ता १८ मीटर रुंदीचा आहे. अशातच सिडकोने बहुमजली इमारतीसाठी जे भूखंड दिलेले आहेत. त्या ठिकाणी रस्ता केवल २४ मीटरचा असल्यामुळे भविष्यात कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोर होणारी कोंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजन प्राधिकरण म्हणून शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासावर योग्य त्या उपाययोजना करण्याकडे नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप होत आहे.
------------------------------
कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. अशातच या बहुमजली इमारतीचा वाहतुकीवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी अहवाल तयार करण्याची गरज आहे.
- मंगेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते
--------------------------------------
कोपरखैरणे रेल्वे स्थानकासमोर होत असलेली वाहतूक कोंडी होत आहे. या संदर्भात सिडकोसोबत समन्वय साधून संबंधित रस्त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com