‘फ्लेमिंगो सिटी’च्या नावलौकिकाला ग्रहण

‘फ्लेमिंगो सिटी’च्या नावलौकिकाला ग्रहण

घणसोली, ता. २४ (बातमीदार)ः नवी मुंबई महापालिकेने ‘फ्लेमिंगो सिटी’ची ओळख जपण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फ्लेमिंगोचे पुतळे उभारले आहेत. या माध्यमातून शहराची वेगळी ओळख अधोरेखित होत आहे. मात्र, शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या पुतळ्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी रंग उडल्याने बदकाचे स्वरूप आले आहे, तर काही ठिकाणी तुटलेल्या अवस्थेतील फ्लेमिंगो दिसत आहेत.
नवी मुंबईत खाडीकिनारी दरवर्षी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येत असतात. या पक्ष्यांमुळे नवी मुंबई शहराला फ्लेमिंगो सिटी अशी नवी ओळख मिळालेली आहे. त्यामुळे पालिकेकडून शहराची ही वेगळी ओळख जपण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. याच अनुषंगाने पालिकेने शहरातील काही चौक, उद्यानात, दुभाजकांवर फ्लेमिंगोंच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. मात्र, त्यांची दुरवस्था झाल्याने फ्लेमिंगोंच्या या प्रतिकृतींचे रंग उडाल्याने बगळ्याचे स्वरूप आले आहे; तर काही ठिकाणी मोडतोड झाल्याने ‘फ्लेमिंगो सिटी’च्या नावलौकिकालाच ग्रहण लागल्याची भावना व्यक्त केली जात आहे. याबाबत संजय देसाई यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
--------------------------------
नवी मुंबई शहराचे वेगळेपण जपण्यासाठी महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे. हा खर्च जनतेच्या खिशातून होत असल्याने शहरात सुशोभीकरणासाठी लावलेल्या साधनांची झालेली दुरवस्था पाहून नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा विषय फक्त फ्लेमिंगोपुरता मर्यादित नसून शहरातील अन्य प्रतिकृती, पुतळे यांची अवस्थादेखील तशीच असल्याने महापालिकेने याकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी नवी मुंबईकरांकडून होत आहे.
----------------------------------------------------
नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या शिल्पाचे, पुतळ्याचे दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. पालिकेच्यावतीने याकडे लक्ष देऊन काम सुधारणा करणे गरजेचे आहे.
- गणेश सकपाळ, समाजसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com