प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत बिस्कीट कॉर्नर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत बिस्कीट कॉर्नर
प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत बिस्कीट कॉर्नर

प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत बिस्कीट कॉर्नर

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २४ (बातमीदार) : वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्र हे पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या वेशीवर केंद्र आहे. पालघरमधील आदिवासी बांधव वज्रेश्वरी येथे उपचार घेण्यासाठी येतात. या आरोग्य केंद्रात मिशन माणुसकी फाऊंडेशनतर्फे मोफत बिस्कीट कॉर्नर सुरू करण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी परिसरातील दुकाने बंद असताना या कार्नरमधून रुग्णासह त्याच्या नातेवाईकांना पोटाला आधार म्हणून बिस्किट तरी खाता येईल, असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे फाऊंडेशनचे प्रमोद पवार, रूपेश जाधव, मिलिंद कांबळे यांनी सांगितले. या फाऊंडेशनमार्फत परिसरात अनेक उपक्रम राबविले आहेत. अंबाडी नाका येथे अवघ्या दोन रुपयांमध्ये रुग्णावर उपचार केले जातात. रुग्णांना मोफत रुग्णवाहिका पुरवली जाते. या उपक्रमामध्ये भूक लागेल त्याने पेटीतून बिस्कीट काढून खायचे आहे किंवा ज्याला कोणाला वाटले, तर या पेटीत बिस्कीट आणूनदेखील ठेवू शकतो, असे मिलिंद कांबळे यांनी सांगितले.