
कळंबोलीतील बारवर पोलिसांचा छापा
पनवेल (वार्ताहर) : कळंबोली पोलिसांनी ट्रक टर्मिनलमधील प्रियंका पॅलेस बारवर छापा मारून १० बारबालांसह चालक, मॅनेजर व साऊंड सिस्टीम ऑपरेटरला ताब्यात घेतले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव केले जात असल्याने ही कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कळंबोलीतील ट्रक टर्मिनलमधील प्रियंका पॅलेस बारमध्ये काम करणाऱ्या महिला तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कळंबोली पोलिसांनी सोमवारी (ता. २२) रात्री सव्वा अकराच्या सुमारास बारवर छापा मारला. यावेळी बारमध्ये काम करणाऱ्या महिला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचे आढळून आले होत. या वेळी पोलिसांनी बारचा मालक प्रीतेश गुफ्ता (३२), मॅनेजर शकील शेख (४२) व साऊंड सिस्टीम ऑपरेटर शमीम शेख (४०) या तिघांसह १० महिलांवर गुन्हा दाखल केला आहे.