आपत्ती व्यवस्थापनाकडे तक्रारी पाढा

आपत्ती व्यवस्थापनाकडे तक्रारी पाढा

ठाणे, ता. २४ (वार्ताहर) : ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे १ ते २२ मे दरम्यान विविध प्रभाग समितीतून २२१ तक्रारी आल्या आहेत. यापैकी १० मे रोजी १८ तक्रारी, तर १७ मे रोजी १६ तक्रारीची सर्वाधिक नोंद झाली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त तक्रारीत आगीच्या ५५, पाईपलाईन डॅमेज झाल्याच्या १८ तक्रारी, तर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणच्या मॉकड्रिलची संख्या १२ एवढी आहे. पालिका विभाग किंवा पोलिस विभागाद्वारे राबवलेल्या आपत्‍कालीन परिस्थितीचा सामना करण्याच्या रंगीत तालमीतही आपत्कालीन विभाग आणि अग्निशमन दर यांचाही सहभाग होता.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील विविध प्रभाग समिती अंतर्गत मे महिन्यात परिसरात आगीच्या घटना सातत्याने होत आहे. १ ते २२ मे पर्यंतच्या कार्यकाळात ठाण्यात विविध ठिकाणी ५५ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. मुंब्रा परिसरातही सोमवारी झोपड्यांना आग लागण्याची घटना घडवून चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. २२ दिवसांच्या या कार्यकाळात आगीच्या ५५ घटनांमध्ये १६ आणि १७ मे रोजी प्रत्येकी सहा घटना घडल्या होत्या, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अविनाश सावंत यांनी दिली.
ठाण्याच्या विविध भागांमध्ये घडलेल्या आगींच्या ५५ घटनांमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून काही घटनांमध्ये किरकोळ जखमी होण्याची घटना घडली. या आगींमध्ये वित्तहानी मात्र झाल्याचे समोर आले आहे. ठाण्यामध्ये दिवसेंदिवस आगीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असून अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन या दोन्ही दलांची मात्र दमछाक होत आहे.

१० मे रोजी सर्वाधिक १८ तक्रारी
१ ते २२ मे दरम्यान ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आगीच्या ५५, पाईपलाईन डॅमेज १८, तर आपत्ती काळात कठीण प्रसंगात बचाव कार्य करण्याबाबत विविध विभागांनी घेतलेल्या रंगीत तालमीची संख्या १२ असल्याचे समोर आले आहे. या २२ दिवसांच्या कालावधी आपत्ती व्यवस्थापनाकडे विविध प्रकारच्या २२१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्‍यापैकी सर्वाधिक तक्रारी १० मे रोजी १८ आणि १७ मे रोजी १६ आल्याची माहिती अविनाश सावंत यांनी दिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com