पडघा ग्रामसभेत नागरी समस्यांवर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पडघा ग्रामसभेत नागरी समस्यांवर चर्चा
पडघा ग्रामसभेत नागरी समस्यांवर चर्चा

पडघा ग्रामसभेत नागरी समस्यांवर चर्चा

sakal_logo
By

पडघा, ता. २४ (बातमीदार) : वाढत्या नागरीकरणामुळे चर्चेत असलेल्या भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. सरपंच अमोल बिडवी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पडघा ग्राम सचिवालयातील सभागृहात पार पडली. या वेळी स्वच्छ भारत अभियान टप्पा - २ मधील हागणदारीमुक्त गाव, सुलभ शौचालय, गटारांची स्वच्छता यासह अपूर्ण असलेला मुख्य रस्ता, बंद पथदिवे, आठवडा बाजारात सुरू असलेली वाहतूक, नालेसफाई यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच नवीन पाणीपुरवठा योजना व महिलांना शासनाने दिलेली एसटी प्रवास सवलत मिळण्यासाठी भिवंडी खडवली बस सुरू करणे, आदी प्रश्न महिलांनी उपस्थित केल्याने त्यावर चर्चा करण्यात आली. या वेळी उपसरपंच गिरीश जाधव ग्रामपंचायत सदस्य व ६० ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी भास्कर घुडे यांनी उत्तरे दिली.