Tue, Sept 26, 2023

उत्तरायण स्मरणिकेचे शनिवारी प्रकाशन
उत्तरायण स्मरणिकेचे शनिवारी प्रकाशन
Published on : 24 May 2023, 10:36 am
वसई (बातमीदार) : ज्येष्ठ नागरिक समाजकल्याण संस्था, पापडी, वसई यांच्या उत्तरायण या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा प्रा. मार्तंड औघडे यांच्या हस्ते शनिवारी (ता. २७) सायंकाळी साडेचार वाजता हुतात्मा बाळा सावंत स्मारक येथे पार पडणार आहे. ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. एकाकी असणाऱ्या ज्येष्ठांना हातभार लावला जातो, त्याचबरोबर मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याचाच एक भाग म्हणून उत्तरायण स्मरणिकेचे प्रकाशन होणार असून नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ नागरिक समाजकल्याण संस्थेच्या सचिव विन्दाली प्रभुदेसाई यांनी केले आहे.