बेकायदा फलकबाजी रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा फलकबाजी रडारवर
बेकायदा फलकबाजी रडारवर

बेकायदा फलकबाजी रडारवर

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. २४ (वार्ताहर)ः पनवेल शहरात काही दिवसांपासून बेकायदा फलकबाजीचा सुळसुळाट सुरू झाला आहे. या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने पनवेल पालिकेने बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा धडाका लावला आहे.
पनवेल महापालिका हद्दीत अनधिकृतपणे बॅनर, होर्डिंग्ज, तसेच भित्तीपत्रके लावण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या पूर्व परवानगीशिवाय ही जाहिरातबाजी केली जात आहे. त्यामध्ये प्रहार अकॅडमी, सिटी बाईक्स पॉईंट, कमांडो करिअर अकॅडमी, परी. स्कूल (किड्स क्लब), प्रिया न्यू बँक जॉब, मातोश्री हॉस्पिटल अशा व्यावसायिक संस्थांचा सहभाग आहे. त्यामुळे स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीच्या जागेवर, विद्युत पोलवर पूर्व परवानगीविना बॅनर्स, पोस्टर्स, फलक, डिजिटल फ्लेक्स, कमानींमधून जाहिराती करणाऱ्यांवर पालिकेकडून कारवाई केली जात आहे.
------------------------------------
फौजदारी गुन्हे दाखल
महापालिकेने संबंधित संस्थांना रितसर नोटीस देऊन दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही प्रहार अकॅडमी, कमांडो करिअर अकॅडमी व प्रिया न्यू बॅंक जॅाबने दंडाची रक्कम भरली नसल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सिटी बाईक्स पॉईंट, प्री. स्कूल (किड्स क्लब), मातोश्री हॉस्पिटल यांना मालमत्ता विद्रुपीकरण कायदा १९९५ नुसार नोटीस बजावली आहे.
-------------------------------------------------------
दंडात्मक कारवाई झालेल्या संस्था
संस्थेचे नाव ठिकाण दंडाची रक्कम (रुपयांमध्ये)
प्रहार अकॅडमी तक्का-पनवेल २ लाख ९४ हजार रुपये
सिटी बाईक्स पॉईंट तक्का-पनवेल १ लाख
कमांडो करिअर अकॅडमी तक्का-पनवेल - १० हजार
प्री. स्कूल (किड्स क्लब) पनवेल २२ हजार ८००
मातोश्री हॉस्पिटल पनवेल ६७ हजार २००
प्रिया न्यू बॅंक जॉब मुलुंड १० हजार
--------------------------------------------------------
राजकीय बॅनरबाजीला अभय
पनवेल महापालिकेची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता अनेक पत्रके व बॅनर लागल्याने त्यावर कारवाई करण्यात आली असली तरी यामध्ये राजकीय, वाढदिवसाच्या बॅनरवर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नसल्याने अशा प्रकारचे बॅनर पालिकेच्या प्रत्येक भागात दिसत आहेत. त्यामुळे ही कारवाई पक्षपातीपणे केली जात असल्याचा सूर उमटत आहे.
------------------------------------------
पालिका क्षेत्रामध्ये अनधिकृतपणे बॅनरबाजी करणे नियमबाह्य असल्याने अशा व्यावसायिकांवर नियमांनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जात आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ज्या व्यावसायिकांना प्रसिद्धी करायची आहे त्यांनी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे.
- कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका