
पडघ्यातून तिघे दुचाकी चोरटे अटकेत
खर्डी, ता. २४ (बातमीदार) : शहापूर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून १० च्या आसपास दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. याबाबत वासिंदच्या स्थानिक गुन्हे शाखेने गंभीर दखल घेत दुचाकी चोरट्यांना पडघा येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दुचाकी हस्तगत केली आहे. खर्डी स्टेशन रोडवर सुबोध शर्मा यांच्या फर्निचर दुकानासमोरील दुचाकी १० मे रोजी दुपारी ३ च्या दरम्यान चोरीला गेल्याची तक्रार खर्डी पोलिस दूरक्षेत्रात करण्यात आली होती. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून पडघा येथून महेश संतोष सावंत (वय २१), प्रमोद जगन मांजे (वय २५) व राजेश बाळाराम वाघे (वय २२) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी दुचाकीचोरीची कबुली दिली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या वासिंद युनिटचे सहायक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, पोलिस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्वे, स्वप्नील बोडके यांनी ही कारवाई केली.
फोटो- खर्डीतून दिवसाढवळ्या चोरीला गेलेली मोटरसायकल हस्तगत करून चोरट्यांना पकडले. त्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व खाली बसलेले चोरटे.