दंडाच्या रक्कमेत सूट देण्याची आॅटो रिक्षा युनियनची मागणी

दंडाच्या रक्कमेत सूट देण्याची आॅटो रिक्षा युनियनची मागणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मुंबईतील वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांकडून आॅटोरिक्षांचे खासगी मोबाईलने फोटो काढून सोईनुसार रिक्षाचालकांवर दंड आकारून आॅनलाईन पद्धतीने दंडाची कारवाई केली जात असल्याचा आरोप करून आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत ७५ टक्के सूट देण्याची मागणी मुंबई आॅटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनने केली आहे.
यासंदर्भात युनियनने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांच्या बेकायदा कारवाईविरोधात तक्रारसुद्धा केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, मुंबईसह महाराष्ट्रामध्ये वाहतूक पोलिस खात्याकडून काही काळापासून मोबाईलद्वारे फोटो काढून ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांवर दंडाची अन्यायकारक कारवाई केली जात आहे. बहुतांश वेळा ऑटोरिक्षा- टॅक्सी चालक-मालक यांची काहीही चूक नसताना सूड बुद्धीने वा अन्य कारणांमुळे ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक यांना दंड आकारला जात आहे. ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक मालकांवर तब्बल ५ हजार ते २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे दंड वाहतूक पोलिसांकडून आकारले गेले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेले ऑटोरिक्षा-टॅक्सी चालक-मालक यांचा स्वयंरोजगार धोक्यात आला आहे. आतापर्यंत आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत ७५ टक्के सूट दिल्यास शिल्लक रकमेचा ऑटोरिक्षा टॅक्सी चालक-मालकांना भरणा करता येईल, शिवाय त्यांचा स्वयंरोजगार धोक्यात येणार नसल्याचे मुंबई आॅटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com