
रेल्वे कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षण पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या १४ रेल्वे कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापकांकडून गौरव करण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेच्या वडोदरा, रतलाम विभागातून प्रत्येकी ४, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद विभागातील प्रत्येकी २ कर्मचारी आणि राजकोट आणि भावनगर विभागातील प्रत्येकी १ रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षण पुरस्कार’ देण्यात आलेला आहे.
चर्चगेट येथे मंगळावरी (ता. २३) आयोजित कार्यक्रमात प्रसंगावधान दाखवून योग्य कामगीरी करणाऱ्याला ‘महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार’ प्रदान केला गेला. या पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तीपत्रक आणि दोन हजार रुपये रोख पुरस्कार यांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, पश्चिम रेल्वेचे महाव्यस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी सन्मानित कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेचे कौतुक केले आणि ते सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदर्श असल्याचे सांगितले. रेल्वे आणि ट्रॅक फ्रॅक्चर शोधणे, चाकांमध्ये हेअरलाईन क्रॅक शोधणे, अनुचित घटना टाळण्यासाठी आपत्कालीन ब्रेकिंग, पुलांवर गंभीर स्थितीत अलार्म चेन खेचणे, रिसेट अलार्म चेन रिसेट करणे, हॉट सुरक्षितपणे चालवणे सुनिश्चित करण्यासाठी उत्साह आणि वचनबद्धता यांसारख्या सुरक्षिततेच्या विविध क्षेत्रांमध्ये पुरस्कार विजेत्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.