परिवहनकडे लवकरच २८३ इंटरसेप्टर व्हेईकल

परिवहनकडे लवकरच २८३ इंटरसेप्टर व्हेईकल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः मुंबई-पुणे महामार्गावर गेल्या पाच महिन्यांत वाहतूक नियम मोडणाऱ्या ४७ हजार ३३२ वाहनचालकांवर विविध गुन्ह्यांतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले. ज्यामध्ये सर्वाधिक ८ हजार १२४ गुन्हे ओव्हरस्पिडिंगचे आहेत; तर लेनकटिंग ७ हजार २८७, विनासिटबेल्ट ६ हजार ६८५ गुन्हे दाखल झाले असून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयाला स्पीडगन आणि इतर गॅझेट्सचे वाहन देण्यासाठी येत्या काळात २८३ इंटरसेप्टर व्हेईकल खरेदी करण्यात येणार असल्याचे राज्य परिवहन विभागाने सांगितले आहे.
सद्यस्थितीत राज्य परिवहन विभागाकडे एक्स्प्रेसवे, समृद्धी महामार्ग आणि इतर राज्य महामार्ग मिळून फक्त ७४ इंटरसेप्टर्स व्हेईकल आहेत. त्यानंतर आता १९६ नवीन इंटरसेप्टर्सचा पहिला लॉट खरेदी केला जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील रस्त्यांवर अपघातांना आळा घालण्यासाठी आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक इंटरसेप्टर्स व्हेईकल लागणार आहेत. ज्यामध्ये स्पीडगन कॅमेरे जे एकाच वेळी अनेक वाहने कॅप्चर करणार असल्याने वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर अधिक कारवाई होणार आहे.

इंटरसेप्टर्सनी अलिकडच्या काही महिन्यांत पुणे द्रुतगती मार्गावर शेकडो गुन्हेगारांना पकडण्यात मदत केली आहे. ज्यामध्ये अवजड वाहनांच्या लेन कटिंगच्या सात हजार २८७ प्रकरणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने पार्किंग तीन हजार ७२०, मोबाईल फोनचा वापर करून वाहन चालवणे ७४२, अनफिट वाहन एक हजार ३९५, विना लायसन्स एक हजार ५६६, विना विमा एक हजार ६३४, वाहन क्रमांन न दिसणे एक हजार २७९, विना परमीट ४०२, प्रवासी वाहनातून मालवाहतूक १३ हजार ९२५, इतर १३ हजार ९२५ असे गुन्हे दाखल झाले.

---------
पाच महिन्यातील कारवाई
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुमारे १२ विविध गुन्ह्यांमध्ये डिसेंबर महिन्यात ३,७९० गुन्हे दाखल झाले. त्याप्रमाणे जानेवारीत १०,९३८, फेब्रुवारी ८,०७०, मार्च १०,१५८, एप्रिल ८,००६, मे ६,४२३ असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

--------------
इंटरसेप्टर व्हेईकलमधील सुविधा
इंटरसेप्टर व्हेईकलमध्ये लेझर तंत्रज्ञानावर आधारित स्पीडगन आहे. पूर्वी रस्त्याच्या कडेला थांबून, स्पीडगनद्वारे कारवाई केली जात होती. आता नव्या वाहनात स्पीडगन ठेवण्याची सुविधा (ट्रायपॉड) आहे. इंटरसेप्टर व्हेईकलच्या माध्यमातून होणाऱ्या कारवाईमुळे पोलिसांकडे पुरावे उपलब्ध होणार आहेत. स्पीडगन, ई-चलन यंत्रासह अन्य सुविधांचा समावेश या वाहनात आहे. मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी ब्रेथ अ‍ॅनलायजर यंत्रणासुद्धा बसवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com