
मुंबई पोलीस दलातील ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : मुंबई पोलिस खात्यात पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून राज्यातील पोलिस उपायुक्त दर्जाच्या ९ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदस्थापनेचे आदेश बुधवारी महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आले आहेत. यामध्ये ९ पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्व बदल्या मुंबई पोलिस दलात करण्यात आल्या आहेत.
गृह विभागाने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मुंबई पोलिस दलात किमान ९ पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. आयपीएस अधिकारी प्रवीण मुंडे, दत्ता नलावडे, प्रसाद अक्कानुरू, अरविंद साळवे, मनोज पाटील, प्रशांत कदम, कृष्णकांत उपाध्याय, मोहित कुमार गर्ग, हरी बालाजी, बालसिंग राजपूत आणि महेश रेड्डी या अधिकाऱ्याची मुंबई पोलिसांत बदली करण्यात आली आहे.