सायन पादचारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद

सायन पादचारी मार्ग दुरुस्तीसाठी बंद

धारावी, ता. २५ (बातमीदार) : धारावीतून सायन, चेंबूर व दादरच्या दिशेने जाण्यासाठी मध्य रेल्वेवरील सायन स्थानकासमोर वाहतूक पूल आहे. या वाहतूक पुलावरून जाण्यासाठी पादचारी मार्ग आहे. हा मार्ग गेले काही दिवस दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्‍यामुळे पादचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. येथून नागरिकांना रस्‍त्‍यावरून चालावे लागत असल्‍याने अपघाताची भीती व्यक्‍त होत आहे.
सायन पादचारी मार्ग दुरुस्‍तीसाठी बंद केला गेला आहे. मात्र, त्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना नाईलाजास्तव वाहतूक पुलावरून जावे लागत आहे. ज्‍येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, रुग्ण, महिला, लहान मुले यांना वाहतूक पुलावरील वाहनांच्या वर्दळीत जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. यामुळे अनेकदा छोटे अपघात होत आहेत. रस्त्यावरून जाताना वाहनाचा धक्का लागल्यास वाहनचालक व पादचारी यांच्यात वाद होत आहेत. पुलावरून हलकी-जड वाहने, बस, दुचाकी यांची सतत वर्दळ असते. पालिकेने या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्‍यान या संदर्भात पालिकेच्या एफ उत्तर कार्यालयात यासंदर्भात विचारणा करण्यासाठी प्रयत्न केला असता अधिकारीवर्गाशी संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com