नवी मुंबईत अपघातांवर नियंत्रण

नवी मुंबईत अपघातांवर नियंत्रण

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागाकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांमध्ये मृत होण्याचे प्रमाण २२ टक्क्यांनी कमी झाले आहे.
नवी मुंबईतील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी वाहनचालकांचे प्रबोधनासोबतच चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे यांनी वाहतूक शाखेच्या माध्यमातून बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी धडक कारवाई केली जात आहे. यात अतिवेगाने वाहन चालवणारे, विनाहेल्मेट, विनासीट बेल्ट, सिग्नल तोडणे, धोकादायक वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेतून कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर विविध महामार्गावरील ब्लॅक स्पॉटचा शोध घेऊन बाह्यमार्ग, सिग्नलचे आधुनिकीकरण, खड्डे भरणे आदी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
-----------------------------------------------------------------
चार महिन्यांमध्ये ७४ अपघात
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत २०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांमध्ये विविध मार्गांवर ९४ प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात ९५ जणांचा बळी गेला होता. मात्र, नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेमुळे २०२३ या वर्षातील जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यामध्ये फक्त ७४ प्राणांतिक अपघात घडले असून त्यात ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
---------------------------------------------------
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातातील मृतांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाईबरोबरच त्यांचे प्रबोधनदेखील करण्यात येत आहे.
- तिरुपती काकडे, पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण विभाग, नवी मुंबई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com