२२५० वाहनांवर कोपरखैरणेत कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२५० वाहनांवर कोपरखैरणेत कारवाई
२२५० वाहनांवर कोपरखैरणेत कारवाई

२२५० वाहनांवर कोपरखैरणेत कारवाई

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. २५ (वार्ताहर) : कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून १ ते २५ मे या कालावधीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २,२५० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे, दारू पिऊन वाहन चालवणे तसेच कर्णकर्कश आवाज असलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
कोपरखैरणे वाहतूक शाखेकडून नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या मोहिमेअंतर्गत १ ते २५ मे दरम्यान कोपरखैरणे वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २,२५० वाहनांवर कारवाई केली आहे. तसेच पुढील काळात अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी दिली आहे.