उद्यानाच्या प्रवेशद्वारावर कब्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर कब्जा
उद्यानाच्या प्रवेशद्वारावर कब्जा

उद्यानाच्या प्रवेशद्वारावर कब्जा

sakal_logo
By

जुईनगर, ता. २५ (बातमीदार)ः विभागात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची समस्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गर्दीच्या ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुईनगर विभागातील नेहमी वर्दळ असलेल्या सेक्टर २३ आणि २५ विभागातील पालिकेच्या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.
नवी मुंबई शहराला विकसित करण्यासाठी महापालिकेने कोणतीही कसर ठेवली नाही. प्रत्येक विभागात सार्वजनिक सोयी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे जुईनगर विभागात आजूबाजूच्या नोडमधील, परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे महत्त्वाचे ठिकाण असलेले सेक्टर २५ येथील विरंगुळा केंद्र तब्बल दीड वर्षाने नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे; तर नवी मुंबई पालिकेचे चिंचोली तलाव उद्यानातील विरंगुळा केंद्रदेखील विरंगुळ्यासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र, या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर फेरीवाल्यांनी कब्जा केला असल्याने येणाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
------------------------------------------------
पार्किंगमुळे कोंडीत भर
या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुले खेळण्यासाठी येत असल्याने मुख्य प्रवेशद्वारावरच आइसस्क्रीम, पॉपकॉर्न विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे सायंकाळी या ठिकाणी दुचाकी चार-चाकीचे पार्किंग फूल होऊन उर्वरित वाहनांना जागा मिळत नसल्याने रस्त्यावर पार्क केली जात आहेत. अशातच फेरीवाल्यांनीदेखील अतिक्रमण केले असल्यामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे.
---------------------------------------
जुईनगर येथील उद्यानातील विविध प्रकारची खेळणी नागरिकांचे प्रमुख आकर्षण आहे. अशातच उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच फेरीवाले बसत असल्याने वाहने उभी करण्यासाठी अडचण होत आहे.
- पूजा साबळे, नागरिक