मिरा-भाईंदर पालिकेचा स्वनिधी से समृद्धी महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिरा-भाईंदर पालिकेचा स्वनिधी से समृद्धी महोत्सव
मिरा-भाईंदर पालिकेचा स्वनिधी से समृद्धी महोत्सव

मिरा-भाईंदर पालिकेचा स्वनिधी से समृद्धी महोत्सव

sakal_logo
By

भाईंदर, ता. २५ (बातमीदार) : केंद्र सरकारच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत स्वनिधी से समृद्धी कार्यक्रम मिरा-भाईंदर महापालिका कार्यक्षेत्रात राबवण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनानुसार २९ मेपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नगर भवन येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करून केंद्र सरकारच्या एकूण आठ योजनांसाठी पथविक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांची पात्रता तपासण्यात येणार आहे. त्यात पंतप्रधान जीवन ज्योती योजना (१,१७२ लाभार्थी), पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (१,६५१ लाभार्थी), पंतप्रधान जन धन योजना व रूपे कार्ड (५८४), इमारत व इतर बांधकाम अंतर्गत नोंदणीकरण (६), पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना (३०१), एक राष्ट्र एक राशन कार्ड (१३३), जननी सुरक्षा योजना (१२) व पंतप्रधान मातृ वंदना योजनेचा एक लाभार्थी अशा एकूण ३,८६० लाभार्थी पथविक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे, असे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले.