आमरसामुळे वाहनांची घसरगुंडी

आमरसामुळे वाहनांची घसरगुंडी

नवीन पनवेल, ता. २५ (वार्ताहर)ः सायन-पनवेल महामार्गावर पनवेलहून बेलापूरकडे जाणाऱ्या रिक्षामधील आमरसाने भरलेली पाच ते दहा किलो वजनाची पिशवी रस्त्यावर पडली होती. या आमरसामुळे जवळपास पाच ते सहा वाहने घसरल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
सायन-पनवेल महामार्गावरील कामोठा ब्रिजवर गुरुवारी (ता. २५) सकाळी पाच ते सहा वाहने घसरल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार आॅइलच्या गळतीमुळे झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, रस्त्यावर आमरस सांडल्याची बाब वाहनचालकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब वाहतूक पोलिसांना कळवण्यात आली होती. या वेळी कळंबोली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी माती टाकून वाहतूक सुरळीत केली. तसेच या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले; पण या प्रकारामुळे वाहतूक कोंडी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com