अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा
सहायक आयुक्‍त सकाळी सात वाजल्यापासूनच हजर
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः मुंबईसह उपनगरांत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा अद्याप सुरूच आहे. एन प्रभागातील बेशिस्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची धडाकेबाज कामगिरी सहायक आयुक्त संजय सोनवणे यांच्याकडून होत आहे. विशेष म्‍हणजे फेरीवाल्‍यांसंबंधी आलेल्या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी सोनावणे सकाळी सात वाजल्यापासूनच कर्तव्यावर हजर राहत असल्याचे पालिकेचे अधिकारी सांगत आहेत.
घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांवर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सलग कारवाई होत आहे. या कारवाईमुळे एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनवणे यांना अनेकदा धमक्या येत असल्‍याचे बोलले जात आहे. दरम्‍यान, दररोज येणाऱ्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी सोनावणे स्वतः सकाळी सात वाजताच ड्युटीवर हजर राहून मोबाईलद्वारे फोटो काढून अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास धाडत आहेत. सहायक आयुक्त संजय सोनवणे यांनी नऊ ऑगस्ट २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत त्यांनी महिन्याला बाराशे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केल्याची माहिती सोनवणे यांनी दिली आहे.

वेषांतर करून कारवाई
कारवाई करताना सहायक आयुक्त संजय सोनवणे हे आपला पूर्ण वेष बदलून कारवाई ठिकाणी जाऊन अधिकारी योग्य कारवाई करत आहेत ना हे पाहत आहेत. त्‍यांनी नुकतीच घाटकोपर पूर्वेकडील रमाबाई नगर परिसरात दोनशे फेरीवाल्यांवर मोठी कारवाई केली आहे. घाटकोपर स्थानकातील खारी टोस्ट विक्रेते यांच्यावरदेखील प्रथम कारवाई करण्यात आली आहे. घाटकोपरमधील एका कारवाईत सोनावणे यांनी वेष बदलून अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली होती त्यामुळे त्यांना गेल्या महिन्याभरापासून धमक्या येत आहेत; याला सोनवणे यांनी दुजोरा दिला आहे. मात्र त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार न करता आपली कारवाई सुरूच ठेवली आहे.

सकाळी वाहतूक कमी असते, अशा वेळी कारवाईच्या ठिकाणी फिरता येते. सकाळी सात वाजता पाहणी केली जाते. त्यानंतर दुपारी कारवाई करणे सोपे जाते. पूर्वतयारी करूनच कारवाई करावी लागते. तक्रारीच्या ठिकाणी सकाळी पाहणी करावी लागते.
- संजय सोनावणे, सहायक आयुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com