व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवू नका : महावितरण

व्हायरल संदेशांवर विश्वास ठेवू नका : महावितरण

मुंबई, ता. २५ : समाजमाध्यमांवर धार्मिक स्थळे आणि सामान्य नागरिकांचे वीजदर वेगवेगळे असल्याबाबतचे संदेश फिरत आहेत. हे संदेश दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा महावितरणने केला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या (प्रकरण क्र. २२६/२०२२) आदेशानुसार मंदिर गुरुद्वारा, चर्च यांसारख्या प्रार्थनास्थळांना व त्यांची सभागृहे, उद्याने यांची इतर कोणत्याही श्रेणीमध्ये नोंदणी नसल्यास त्यांना घरगुती ग्राहकांप्रमाणे वीजदर आकारणी करावी, असे निर्देशित केले आहे. त्यामुळे व्हायरल होणारे संदेश दिशाभूल करण्यासोबतच सामाजिक सलोखा बिघडवणारा असल्याने अशा फसव्या संदेशाला कुणीही बळी पडू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com