मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागला

मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास महागला

उरण, ता. २५ (वार्ताहर) : मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात शुक्रवारपासून (ता. २६) २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमी दरवाढ केल्याने सागरी प्रवास दरवर्षीप्रमाणे महागला आहे. आता या प्रवासासाठी १०५ रुपये मोजावे लागणार आहे.
दरवर्षी पावसाळी हंगामात मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात वाढ केली जाते. मागील वर्षीही तिकिट दरात वाढ केली होती. यावर्षी मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात ८० रुपयांवरून १०५ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. हाफ तिकिट दरातही ३९ रुपयांवरून ५३ रुपयांपर्यंत म्हणजे ९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे, अशी माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.

गेल्यावर्षी पावसाळी हंगामात दिलासा
दरवर्षी मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामाचे कारण पुढे करत प्रत्येक वेळी २० ते २५ रुपयांपर्यंत वाढ केली जाते. ही तिकीट दरवाढ उन्हाळी हंगामातही कायम ठेवली जाते. त्यानंतर पावसाळी हंगामात पुन्हा तिकिट दरवाढ केली जाते. मात्र, २०२२ च्या पावसाळी हंगामानंतर सीझन तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ केली नसल्याने आश्चर्य वाटत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com