एका वर्षाखालील मुलांच्या मृत्यूंची नोंद

एका वर्षाखालील मुलांच्या मृत्यूंची नोंद

कोविडमुळे तीन वर्षांत १५ मुलांचा मृत्यू
खबरदारी घेण्याचे आरोग्‍य यंत्रणेचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये वृद्ध आणि प्रौढांसह निष्पाप बालकांनाही फटका बसला. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून याचा अंदाज येऊ शकतो. २०२० पासून आतापर्यंत मुंबईत कोरोनाने १५ मुलांचा मृत्‍यू झाला आहे. ही मुले शून्य ते एक वर्ष वयोगटातील आहेत. यासोबतच संपूर्ण राज्यात सुमारे १० लाख मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोरेगावमध्ये एका चार महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर कोविड आजही एक महत्त्वाची समस्या असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच कोविड महामारीसारखा राहिला नसून त्याचा धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार मार्च २०२० ते २३ मे २०२३ पर्यंत राज्यात ८१,६८,९३३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी तीन टक्के म्हणजे २,५७,४५३ रुग्ण हे १० वर्षांचे होते; तर ८ टक्के म्हणजे ६,१६,४४७ रुग्ण हे ११ ते २० वयोगटातील मुले आणि तरुण होते. दरम्‍यान, मे महिन्यात आतापर्यंत राज्यभरात कोविडचे ३,०४२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी केवळ चार प्रकरणे ०-४० वयोगटातील होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एकट्या एप्रिलमध्ये राज्यात ३.१ टक्के म्हणजेच ० ते १० वयोगटातील ६८६ लोकांना कोविडची लागण झाली आहे. याशिवाय मे महिन्यात आतापर्यंत राज्यभरात कोविडचे ३,०४२ रुग्ण आढळले आहेत. यातील केवळ चार प्रकरणे ही १५ ते ४० वयोगटातील होती; तर ९७ प्रकरणे ० ते १० वयोगटातील मुले होती. त्याचप्रमाणे ११ ते २० वयोगटातील २३९ प्रकरणे आढळून आली.

चार महिन्यांच्या मृलाचा मृत्‍यू
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले, की कोविड-१९ साठी पॉझिटिव्ह चाचणी घेतलेल्या मुलाला इतर कोविड पीडितांप्रमाणे कोणताही आजार किंवा सहव्याधी नव्हती. डॉ. गोमारे म्हणाल्या, १२ मे रोजी त्याला ताप आणि श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागला आणि त्याच्या पालकांनी १५ मे रोजी त्याला सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती खालावली आणि तीव्र श्वसनाच्या त्रासामुळे १७ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.

रॅपिड अँटीजेन चाचणीचे किट नाहीत
पालिका रुग्णालयातील वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ म्हणाले, की मुलांना ताप आल्यावर कोविडची चाचणी करण्यासाठी बहुतेक रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटीजेन चाचणीचे किट्स उपलब्ध नाहीत. मुलांमध्ये काही लक्षणे आढळल्यास आम्ही त्यांना अँटीव्हायरल औषधोपचार सुरू करतो, कारण त्यांना कोविड किंवा इन्फ्लूएन्झाची लक्षणे असू शकतात. जगभरात एकूण कोविड रुग्णसंख्येच्या फक्त १ टक्का मुलांचे प्रमाण आहे. २०२१ मध्ये सुरू झालेल्या ओमिक्रॉन लाटेत त्यांचे प्रमाण वाढले होते.

२०२० पासून कोविडमुळे लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. दरम्यान, इतर रुग्णांच्या संख्येत ही संख्या कमी आहे. सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील कोविड सुविधेमध्ये २०२० ते २०२१ दरम्यान सुमारे १८ महिन्यांत १५० रुग्ण दाखल झाले होते आणि ११ मुलांचा मृत्यू झाला होता. बहुतेक पीडितांना टीबी, जन्मजात हृदयविकार किंवा गंभीर कुपोषण होते.
- डॉ. बेला वर्मा, बालरोग विभागप्रमुख, जे. जे. रुग्णालय

कोविडग्रस्‍तांची आकडेवारी (२३ मे पर्यंत)
राज्‍य
८१,६८,९३३ एकूण रुग्‍ण
२,५७,४५३ १० वर्षांखालील मुले (३ टक्‍के)

एप्रिल महिना
२१,७८० एकूण रुग्‍ण
६८६ १० वर्षांखालील मुले (३.१ टक्‍के)

मे महिना
३,०४२ एकूण रुग्ण
९७ १० वर्षांखालील मुले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com