तळ गाठल्यानंतर निर्देशांक सावरले

तळ गाठल्यानंतर निर्देशांक सावरले

मुंबई, ता. २५ : अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीतील प्रतिकूल संकेतांमुळे जागतिक शेअर बाजार नरमगरम राहिल्याने आज (ता. २५) भारतीय बाजारही सकाळी कोलमडले होते. मात्र, शेवटच्या तासातील खरेदीमुळे सेन्सेक्स ९८.८४ अंश; तर निफ्टी ३५.७५ अंशांनी वाढला. भारतीय शेअर बाजार निर्देशकांनी आज तळाचा भाव दाखवल्यानंतर तेथून उसळी मारणे हा चांगला संकेत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

अमेरिकी फेडच्या बैठकीमुळे बुधवारी अमेरिकी बाजारही घसरले होते. त्यामुळे आज आशियाई आणि युरोपीय शेअर बाजार संमिश्र कल दाखवत होते. त्यामुळे सकाळी व्यवहार सुरू होताना भारतीय शेअर बाजार कोसळले होते. दिवसभर ते त्याच पातळीवर होते. मात्र, शेवटच्या तासात खरेदी झाल्यामुळे निर्देशांक सावरले. दिवसअखेरीस सेन्सेक्स ६१,८७२.६२ अंशावर; तर निफ्टी १८,३२१.१५ अंशांवर स्थिरावला.

सेन्सेक्सने आजही बासष्ट हजारांना स्पर्श करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. सेन्सेक्स ६१,९३४ अंशापर्यंत गेला होता. आज तेल व नैसर्गिक वायू, सरकारी बँका तसेच अर्थसंस्था या क्षेत्राच्या शेअरमध्ये तोटा होता; तर बाकी सर्व क्षेत्रांचे शेअर नफा दाखवीत होते. सेन्सेक्समधील एअरटेल, आयटीसी, कोटक बँक, लार्सन टुब्रो, बजाज फायनान्स, इन्फोसिस, नेस्ले, एशियन पेंट, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव वाढले; तर विप्रो, टाटा मोटर, इंडसइंड बँक, एचडीएफसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक, टाटा स्टील या शेअरचे भाव घसरले.
.......
जागतिक आर्थिक वातावरण प्रतिकूल असूनही भारतीय शेअर बाजार आधार पातळी शोधत आहे. मात्र, मोठ्या तेजीसाठी निफ्टीने १८,४५०चा प्रतिरोध वरच्या दिशेने तोडणे आवश्यक आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जागतिक घटनांवरही नजर ठेवावी.
- राजेश भोसले, एंजल वन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com