Wed, Sept 27, 2023

जेजे रुग्णालयात उच्चरक्तदाबावर जागृती
जेजे रुग्णालयात उच्चरक्तदाबावर जागृती
Published on : 25 May 2023, 2:16 am
मुंबई, ता. २५ : मुंबईत उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत असून, नागरिकांमध्ये जास्तीत जास्त जागरूकतेची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर जे. जे. रुग्णालयात औषध विभागातर्फे जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्ताने जागरूकता मोहीम गुरुवारी राबवण्यात आली. यात ओपीडीत आलेल्या जवळपास २०० हून अधिक नागरिकांसह डॉक्टरांचीही तपासणी करण्यात आली. यासह जीवनशैलीबाबत जागरूक करण्यात आले. खाण्या-पिण्याच्या सवयी, बैठी जीवनशैली आदींमुळे झालेला परिणाम, तणावग्रस्त शरीर, व्यसने आणि इतर सर्वच गोष्टींचा परिणाम शरीरावर होतो. त्यामुळे नागरिकांची तपासणी केल्याचे औषध विभागाचे डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.