स्वा. सावरकर जयंतीदिनी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वा. सावरकर जयंतीदिनी कार्यक्रम
स्वा. सावरकर जयंतीदिनी कार्यक्रम

स्वा. सावरकर जयंतीदिनी कार्यक्रम

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : राज्य सरकारच्या पर्यटन विभागामार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती दिनानिमित्ताने ‘वीर सावरकर पर्यटन सर्किट’ आणि ‘वीरभूमी परिक्रमा’ आदी उपक्रम राबवून मानवंदना देण्यात येणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून ही माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावांतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेऊन मोलाचे योगदान देणारे थोर, महात्मा, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वा. सावरकरांचे योगदान युवा पिढीच्या स्मरणात रहावे, यासाठी सरकार स्तरावर पर्यटन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, शुक्रवारी (ता. २६) सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.